कथा - सौदा (ऑडीओसह)

पुनश्च    शं. ना. नवरे    2020-09-19 06:00:01   

अंक – सत्यकथा, जून १९५१ कथेबद्दल थोडेसे : चटपटीत शैली, बारीकसा धक्का देणारा आशय, व्यक्तिरेखाचित्रणाची कमाल आणि उत्तम वातावरण निर्मिती ही शन्नांच्या (शं.ना नवरे. २१ नोव्हेंबर १९२७-२५ सप्टेंबर २०१३)  कथांची वैशिष्ट्य. मानवी स्वभावातील संगती आणि विसंगती दोन्ही ते सहज कथानकाच्या चिमटीत धरत असंत. कथा,कादंबरी, नाटक,  चित्रपट पटकथा असा शन्नांचा लेखन संसार अमाप आहे. एवढे प्रचंड लिहूनही त्यांच्या शैलीतली प्रसन्नता आणि नाविन्य कधीच हरवले नाही. त्यांच्या याच धाटणातली ही कथा आहे. वाचा किंवा ऐका किंवा दोन्ही. ******** राऊंड टेंपलजवळच्या एका गल्लीत तोंडाशी असलेल्या ‘कॅफे हैदरी’ हॉटेलांतल्या साडे पांच—छे चा बखत. आजूबाजूला रस्ते गजबजलेले. जिकडे पहावं तिकडे हिरव्या चौकड्यांच्या लुंग्यांत नि गोंडेदार तांबड्या टोपींत वावरणारे मुसलमान नि काही बुरख्यांतल्या बायका. अधूनमधून एखादा पांढऱ्या कपड्यांतला गुजराती किंवा मराठा. रस्त्यावर एखाद मुसलमान छत्रीच्या सांवलीत, पत्र्याच्या डब्यांत ठेवलेली असली गांवठी औषधं विकत बसलेला. दुकानांच्या पायऱ्यांवर बसलेले अत्तरं विकणारे काही मुसलमान. कुणी कापूस लावून ठेवलेली काडी कानावर अडकवून नि जवळ छोटीशी चामड्याची बॅग घेऊन मळ काढणारे. त्या बहुतेकांच्या टोंकदार मिशा. किराणा मालाची मकाणं, रद्दीची मकाणं, बुटांची मकाणं—नि बहुतेक सर्व बकाल. गल्लीत बैदुलं खेळणारी मळक्या अंगाची नि अंगाला मोठ्या होणाऱ्या गडद रंगच्या खमिसांतली पोरं. जवळपास कुठंही सौंदर्य नाही पहायला! ‘काफे हैदरी’ मुसलमानांच्या दृष्टीनं मोठं शाही होटेल. बाहेर उर्दू लिपींत लिहिलेली पदार्थांची नावं नि बरोब्बर मध्यावर तांबड्या नि हिरव्या रंगांत लिहिलेलं ऐ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या


चाचणी सभासदत्व घ्या

किंवा

आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लॉगिन करा

कथा , सत्यकथा

प्रतिक्रिया

 1. suuniitii@gmail.com

    2 वर्षांपूर्वी

  खुप छान गोष्ट, अन्वरची आयडिया आवडली

 2. san_kadam2004@rediffmail.com

    2 वर्षांपूर्वी

  छान

 3. Prakash2412

    2 वर्षांपूर्वी

  खुप छान

 4. sondara.sudam@gmail.com

    2 वर्षांपूर्वी

  सुरवात केली आणि गोष्टीत सामील झालो .

 5. suhasnannajkar07@gmail.com

    2 वर्षांपूर्वी

  छान

 6. sawdekardigambar5@gmail.com

    2 वर्षांपूर्वी

  शेवटी फारच गंमत वाटली

 7. mukunddeshpande6958@gmail.com

    2 वर्षांपूर्वी

  वाहवा

 8. dhananjay

    2 वर्षांपूर्वी

  क्या बात है, सुंदर क्लायमॅक्स.

 9. nitinddhage

    2 वर्षांपूर्वी

  अप्रतिम धक्कतंत्र!

 10. atmaram-jagdale

    2 वर्षांपूर्वी

  अरे वा ! शेवट धक्कादायकच . कथा आवडली .वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen