उमा कुलकर्णी- मुलाखत

पुनश्च    मुकूल रणभोर    2019-12-25 06:00:51   

प्रश्न : 'भाषांतर आणि अनुवाद यांतील फरक काय?' हा मुद्दा नेहमी चर्चिला जातो. यावर आपले मत काय? उत्तर : अनुवाद याचा शब्दशः अर्थ 'नंतर अर्थ सांगणे' असा म्हणता येईल. उदा. एका जुन्या ग्रंथात मला 'गुरूने त्या श्लोकाचा अनुवाद नंतर सांगितला.' असा संदर्भ मिळाला. तो मला पटला. तो अर्थच मला स्वत:ला अपेक्षित आहे. एीशिलळरश्रश्रू ललित कलाकृतींच्या बाबतीत. 'अनुवाद' असं म्हणताना एखादी ललित कलाकृती जे बोलते ते दुस-या भाषेत वळविणे. 'भाषांतराचा'चा विचार करायचा झाल्यास 'या भाषेतील मजकूर त्या भाषेत नेणे' असा ढोबळ अर्थ सांगता येईल. वैचारिक साहित्य, तत्त्वज्ञान या विषयांसंदर्भात भाषांतराला फार महत्त्व आहे. तिथे भाषेच्या बाबतीत काटेकोरपणा अपेक्षित आहे. मी जे काही करते त्याला मी अनुवाद म्हणते. माझा हेतू भाषांतराचा नाही; अनुवादाचा आहे.   प्रश्न : तौलनिक अभ्यासामुळे विविध भाषा जवळ येऊ शकतील काय? उत्तर : भाषा जवळ येतील की नाही माहित नाही; माणसं नक्की जवळ येतील. एके काळी कन्नडच्या संदर्भात मराठी नाटक किंवा सिनेमांमध्ये विनोद निर्मितीसाठी कन्नड पात्र वापरायची पद्धत होती. कन्नड माणूस विनोदी असू नये हे माझे म्हणणे नाही. विनोद हा वेगळा प्रांत आहे. एकमेकांत परिचय कमी असल्याने संवादातून ज्या भाषेच्या चुका घडायच्या त्यातून विनोदनिर्मिती होत असे. अनुवादामुळे एकमेकांचा परिचय होतो असे लक्षात येते. उदा. इकडची माणसे प्रवासाला कर्नाटकात गेल्यावर वेगवेगळ्या टप्प्यांवरुन फोन करतात. जसे की, आम्ही 'वंशवृक्ष'मधील कपिला नदी पाहिली किंवा गेलो होतो, एरवी नंजनपूरला sightseeing म्हणून जाणं वेगळं परंतु 'एखाद्या आवडत्या कादंबरीतील ते स्थान आहे या दृष्टीने बघणं' असं एक वेगळं नातं तयार होतं. उदा. बंगालीतून मराठीत आ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या


चाचणी सभासदत्व घ्या

किंवा

आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लॉगिन करा

भाषा , अनुभव कथन , व्यक्ती विशेष , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. Rdesai

    2 वर्षांपूर्वी

  खुप छान!

 2. sureshgurav

    2 वर्षांपूर्वी

  खुप छान आणि सखोल मुलाखत. मला त्यांना ऐकायच होत.त्याची महाभारतावरील पर्व कादंबरी खुप आवडली.

 3. manisha.kale

    2 वर्षांपूर्वी

  अतिशय मुद्देसूद मुलाखत.

 4. patankarsushama

    3 वर्षांपूर्वी

  खूप माहितीपूर्ण लेख आहे

 5. Meenalogale

    3 वर्षांपूर्वी

  फारच सुंदर आणि माहितीपूर्ण मुलाखत.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen