प्रितीश भुसारी

पुनश्च    मुकूल रणभोर    2019-12-13 06:00:00   

यशस्वी माणूस कोण? किंवा कोणाचे जीवन अर्थपूर्ण आहे असे आपण मानतो? पैसे, मान, प्रसिद्धी या सर्व गोष्टी झूठ आहेत हे जरी आपण मानत असलो तरी आपल्या आजूबाजूच्या लोकांना मात्र याच निकषांवर आपण तोलत असतो. आणि मग आयुष्यात काही लोक असे भेटतात जे पूर्णपणे या निकषांच्या कसोटीला छेद देतात. आज आपण ज्या अनेक प्रसिद्ध संस्था किंवा कंपन्या बघतो, त्यांच्या मागे कोणाची प्रेरणा आहे हे आपल्याला ठाऊक देखील नसते. आपण केवळ 'सरफेस' फार काय दिसते ते बघून समाधानी असतो. वृक्षाच्या फांद्यांच्या पसार्‍यापेक्षा त्याच्या मुळांना अधिक महत्त्व आहे. आणि खरंतर मुळांपेक्षा महत्त्वाचं असतं त्याचं बीज. समाजाला फांद्या दिसतात. काही चिकित्सक लोक मुळांपर्यंत पोहोचतात. बीज शोधून काढणे म्हणजे केवळ अशक्य. प्रितीश भुसारी म्हणजे अशीच एक वल्ली - जी एका बीजाचं काम करत आली आहे.   प्रितीशचे वय खरतरं माझ्याइतकेच - तिशीच्या आत. तो प्रसिद्ध वगैरे अजिबातच नाही. परंतु अनेक क्षेत्रात आज जी प्रसिद्ध लोकं आहेत, त्यांच्या तो फार पुढे पोहोचला आहे. उदाहरणार्थ, तो कदाचित आजचा मराठी भाषेतील सर्वात प्रतिभावान कवी आहे हे माझे वैयक्तिक मत आहे; परंतु त्याच्या कविता कुठेच वाचायला मिळणार नाही. ज्या मोठ्या मराठी लेखकांचे आणि कवींचे आपण कंठ सुकेपर्यंत गोडवे गातो, त्यांचे मर्म आणि सार खर्‍या अर्थाने त्याला कळले आहे. संगीतापासून ते आहार शास्त्रापर्यंत अनेक विषयांची आणि शास्त्रांची त्याला सखोल माहिती आहे. कोण आहे हा माणूस? हा इतका 'भारी' आहे तर कोणालाच त्याच्याबद्दल काहीच कसे माहिती नाही?   माझी आणि प्रितीशची गाठ प्रथम पडली ती 2006 साली. दहावीच्या शिकवणीचा पहिला दिवस. वर्ग सुरू व्हायला पंधरा मिनिटे होती परंतु पहिला दिवस म्हणून अ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या


चाचणी सभासदत्व घ्या

किंवा

आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लॉगिन करा

व्यक्ती विशेष , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. hemant.a.marathe@gmail.com

      2 वर्षांपूर्वी

    काही वेगळं व्यक्तीमत्व आहे हे, याबद्दल आणखीन समजून घ्यायला आवडेलवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen