शब्दांच्या पाऊलखुणा - शेर शिजवला अन् विस्तव विझवला (भाग २३)


“अग्नीचं घरगुती रूप म्हणजे विस्तव. वि. का. राजवाडे महानुभाव पंथातील लीळाचरित्र या ग्रंथात  वीसदेओ’ हा शब्द बरेचदा आल्याचे सांगून त्याची व्युत्पत्ती वीसदेओ - वीसदो – वीस्तो – विस्तू – विस्तव अशी झाल्याचे सांगतात. तर अ. पां. कुलकर्णींनी ‘स्तुती’ या शब्दाला ‘वि’ हा उपसर्ग लावून ‘विस्तव’ म्हणजे स्तुती करण्याची वेदांतातील एक देवता अशीही एक व्युत्पत्ती सांगितली आहे. मात्र ही व्युत्पत्ती त्यांना उथळ वाटते. वि. का. राजवाड्यांनी सांगितलेली व्युत्पत्तीच त्यांनाही ग्राह्य वाटते. यातली कोणतीही व्युत्पत्ती मान्य केली तरी मानवाला अग्नी म्हणजे विस्तव पूज्य आहे, हे मान्य करावं लागतं.” – साधना गोरे ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ या सदरातून अग्नी – आग – विस्तव – निखारा - अंगार या शब्दांचा प्रवास उलगडून दाखवतायत.
मानवाला लागलेल्या काही शोधांमुळे त्याच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडून आलेले दिसतात. उदा. धातूंचा शोध, भाषेचा शोध, अग्नीचा शोध इ. शोधांमुळे मानवी इतिहासात आधी आणि नंतर अशी स्पष्ट सीमारेषा निर्माण झाली. या शोधांमुळे त्याचे आयुष्य अधिक सुखकर झाले. बोलता येऊ लागल्यामुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला, तेच अग्नीबद्दलही म्हणता येईल. किंबहुना, अग्नीचा शोध लागल्यावर मनुष्य शिजलेलं अन्न खाऊ लागला, त्यामुळे वाचलेली ऊर्जा मानवी मेंदूला बोलण्यासाठी, स्वरनिर्मितीसाठी वापरता आली, असं नवं विज्ञान सांगतं. अर्थात, उत्क्रांतीच्या दरम्यान झालेले इतर बदलही त्याला साहाय्यभूत झाले. तर या ‘अग’, ‘अग्नी’, ‘आग’ या शब्दांशी संबंधित कितीतरी प्रयोग मराठी भाषेत केले जातात.
संस्कृतमधील ‘अग्नी’ शब्दाचे ‘गिनी’, ‘अग्गी’, ‘अग्गि’ असे रूप बदलत मराठी, हिंदी, गुजराती या भाषांमध्ये ते ‘आग’ असे झाले. तर  सिंधीमध्ये ‘अगि’, पंजाबीमध्ये ‘अग्ग’, मैथिलीमध्ये ‘आगि’, बंगालीमध्ये ‘आगुन्’, ओरियामध्ये ‘णिअ’, काश्मिरीमध्ये ‘ओगुन’, सिंहलीमध्ये ‘अग’ असे त्या-त्या भाषेच्या स्वभावाप्रमाणे अग्नीचे रूप बदलत गेलेले दिसते.
एखादी भाषा म्हणजे त्या भाषक समूहाची अनुभव घेण्याची पद्धत, जगण्याची रीती – परंपरा असते. विशेषतः त्या-त्या भाषेतील म्हणी आणि वाक्प्रचार यांमध्ये हे विधान अधिक खरे ठरते. म्हणून तर एका भाषेतील म्हणी – वाक्प्रचार दुसऱ्या भाषेत भाषांतर करणे कठीण जाते. अग्नी – आग या शब्दांशी संबंधित कितीतरी प्रयोग मराठीत रूढ आहेत. वनात निसर्गतः लागलेली आग

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या


चाचणी सभासदत्व घ्या

किंवा

आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लॉगिन करा

शब्दवेध , शब्द व्युत्पत्ती , शब्दांशी मैत्री , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र , मराठी प्रथम

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen