शब्दांच्या पाऊलखुणा - लागोभागो दिवाळी! (भाग १९)


भारतातील सर्वच प्रांतातील हिंदू धर्मियांमध्ये दिवाळी सण साजरा केला जातो. तो साजरा करण्याच्या पद्धती प्रांतानुसार भिन्न असतील, पण दिव्यांची आरास हा त्यातील समान धागा आहे. दिवा म्हणजे दीप, सूर्याचे-अग्नीचे प्रतीक, आणि ओघाने प्रकाशाचे, तेजाचे आणि आशेचेही. आदिम अवस्थेत मानवाला केवळ सूर्याच्या प्रकाशाचीच ओळख असणार. मात्र अग्नीच्या शोधाने आणि तो अग्नी आपल्यालाही निर्माण करता येऊ शकतो, या प्रचितीने माणूस हरकला नसला तरच नवल होतं. रोजच निओन साइनच्या झगमगाटात वावरणाऱ्या आपल्याला तेलाच्या दिव्याचं कौतुक दिवाळीपुरतंच उरलं असलं तरी, आदिम अवस्थेतल्या माणसासाठी अग्नीचा शोध हा मोठा चमत्कारच होता. उगवत्या सूर्यबिंबाने काळोख नाहीसा होऊन, दाही दिशा उजळण्याचा अनुभव माणसाने कित्येक वर्षं घेतला असणार आणि मग तीच प्रचिती त्याला अग्नीबाबतही आली असेल, तेव्हा सूर्याइतकाच त्याला अग्नीही पूज्य वाटला असेल. दिवाळी सण म्हणजे त्या अग्नीची, प्रकाशाचीच तर पूजा आहे! केवळ हिंदू धर्मातच नव्हे, तर इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू यांच्याही धार्मिक विधीत विविध स्वरूपात अग्नीचे अस्तित्व दिसते.

                                                                                          हेही वाचलंत का?
         शब्दांच्या पाऊलखुणा - 'घट'स्थापना (भाग - १८)https://bahuvidh.com/marathipratham/22329
शब्दांच्या पाऊलखुणा - केरसुणीला... (भाग - १७)https://bahuvidh.com/marathipratham/22206

मानवी मन भाषेचा वापर करताना कोणत्या अनुभवाची सांगड कशाशी घालेल हे सांगता येत नाही. दिवाळी आनंदाचा सण म्हणून त्याच्याइतक्याच आनंदाच्या – दसऱ्याच्या सणाशी त्याचा मेळ घालून दसरा-दिवाळीचे शब्दप्रयोग तयार झाले आहेत, तर दुसरीकडे आनंदमय दिवाळीची साधेपणाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळी सणाशी तुलना करून बऱ्याच म्हणीही तयार झालेल्या दिसतात. दिवाळी हा भरभराटीचा, चैनीचा सण आहे. म्हणून तर एखादा चंगळ करत असेल तर ‘तुझी दिवाळी आहे’ असं म्हटलं जातं. किंवा, एखादा रोजच सुखात लोळत असेल तर ‘राजाला रोजच दिवाळी’ असा शब्दप्रयोग केला जातो. याउलट, शिमग्यात म्हणजे होळीत बोंब मारली जाते, आणि बोंब मारणे हे दारिद्र्याचे, अभावाचे लक्षण आहे.  यावरून जवळ धन असेल तोवर चैन करायची, नसेल तेव्हा बोंब मारायची, या अर्थाने ‘असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा’ असं म्हटलं जातं. दिवाळी-शिमग्याच्या सणांचा विशेष सांगणारी आणखीही एक म्हण आहे – ‘आधी दिवाळी मग शिमगा’. शालिवाहन कालगणनेनुसार आधी दिवाळी येते आणि वर्षाच्या अखेरीस शिमगा येतो. दिवाळीचे दिवस तसेही सुगीचे, अर्थात चैनीचे; तर वर्षाच्या शेवटी येणाऱ्या शिमग्यात सर्व खडखडाट होतो. यावरून सुबत्ता असेल तेव्हा ऊतमात केली तर शेवटी हालच वाट्याला येणार, या अर्थाने ही म्हण वापरली जाते. तसेच दारिद्र्य आणि श्रीमंती प्रत्येक समाजात असते हे सांगताना, ‘एकाची दिवाळी तर दुसऱ्याची होळी’ असंही म्हटलं जातं. एखादा घरी अभावाचे जगत असला तरी बाहेर वावरताना तो तसे न दाखवता, आपण चैनीत असल्याचे भासवत असेल, तर अशा व्यक्तींच्या संदर्भात ‘घरात शिमगा, बाहेर दिवाळी’ असं म्हटलं जातं. काही व्यक्तींना इतरांकडून काही घेताना आनंद होतो, मात्र इतरांसाठी काही करताना त्यांचा हात आखडतो, किंवा त्यांना त्रास होतो; अशा व्यक्तींना उद्देशून 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या


चाचणी सभासदत्व घ्या

किंवा

आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लॉगिन करा

भाषा , शब्द व्युुत्पत्ती , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र , ज्ञानरंजन
भाषा

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen