शब्दांच्या पाऊलखुणा - सेनापती शत्रूला जाऊन मिळाला! (भाग - दहा)


"भेटणे – मिळणे या क्रियापदांच्या अर्थाशी काहीएक साम्य असणारे ‘आढळणे’ हे आणखी एक क्रियापद आहे. ‘आढळणे’चे कोशातले अर्थ स्थिर होणे, भेटणे, दिसणे, सापडणे, गवसणे, लक्षात येणे असे आहेत. मात्र प्रमाणभाषेत हे क्रियापद सर्वसाधारणपणे ‘सापडणे’ इतक्याच मर्यादित अर्थाने वापरले जाते. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः सांगली – सातारा या पट्ट्यात ‘आढळणे’ हे क्रियापद व्यक्ती भेटणे, दिसणे या अर्थाने आजही सर्रास वापरले जाते.” भेटणे – मिळणे – आढळणे या क्रियापदांच्या व्युत्पत्तिविषयी आणि त्यांच्या पर्यायी वापराविषयी सांगतायत साधना गोरे –

-------------------------------------------------------------------------

गेल्या लेखात आपण भेट – भेटणे या शब्दांचे मूळ, त्यांचे कोशगत अर्थ यांविषयी चर्चा केली. (आधीचा लेख - शब्दांच्या पाऊलखुणा – पैसे भेटले? (भाग – नऊ)‘भेटणे’ या शब्दात जवळ येणे, एकत्र येणे अशा अर्थच्छटा स्पष्ट करताना गीतकार ग. दि. माडगूळर आणि जगदीश खेबूडकर यांच्या गाण्यांची उदाहरणे पाहिल्याचे तुम्हाला आठवत असेल. या दोन गीतकारांच्या दोन गाण्यांतून नदी सागराला मिळते तशी भेटतेही, हे पाहिले होते. यावर कुणाला असेही म्हणता येईल की, आपल्या लोकसंस्कृतीत नदी, सागर हे सजीव असतात आणि अशा लोकगीतांमधील भाषेचा वापर लक्ष्यार्थाने - व्यंग्यार्थाने घ्यायचा असतो. तसा तर भाषेचा सगळाच वापर लक्ष्यार्थानेच घ्यायचा असतो, नाही का?

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या


चाचणी सभासदत्व घ्या

किंवा

आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लॉगिन करा

ज्ञानरंजन , भाषा

प्रतिक्रिया

 1. dabhay

    2 वर्षांपूर्वी

  सजीवांची भेटणे आणि मिळणे यातील अर्थबोध झाला । अप्रतिम लेख धन्यवाद।

 2. pgovind

    2 वर्षांपूर्वी

  प्रसंगानुसार होतअसलेला शब्दाचा वापर त्यातूनच त्याच्या अर्थाच्या छटा वृद्धींगत होतात.

 3.   2 वर्षांपूर्वी

  आढळणे शब्दाचे अगदी नेमके विश्लेषण.

 4. nehasawant

    2 वर्षांपूर्वी

  खूपच उपयुक्त आहे हा लेख

 5. nehasawant

    2 वर्षांपूर्वी

  खूपच सुंदर लेख. अनेक क्रियापदे, शब्द चुकीच्या अर्थाने वापरले जातात, त्याकडे या लेखामुळे लक्ष जाईलवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen