अरुणच्या आठवणी


अंक: ललित, एप्रिल-मे- जून २०२० सकाळपासून मनाला विचित्र हुरहूर लागून राहिली होती; का ते कळत नव्हतं, पण हातातल्या कामात मन लागत नव्हतं आणि अचानक फोनवर दुष्ट अक्षरं उमटली - ‘‘अरुण फडके यांचं नाशिक येथे निधन.’’ वाचून सुन्न झाले आणि डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या. मनाने आतल्या आत टाहो फोडला - ‘का? का?’ अरुण मला धाकट्या भावासारखा होता आणि त्यानं असं ताईच्या आधीच निघून जावं? का? थोडं भानावर आल्यावर जवळच्या लोकांना कळवायला सुरुवात केली. अरुणच्या आणि माझ्या जवळची माणसं म्हणजे कोण असणार? आपल्या मराठी प्रकाशनविश्वातलीच सगळी, म्हणजे कुणी लेखक, कुणी प्रकाशक, कुणी संपादक तर कुणी मुद्रितशोधक. अगदी काही पत्रकार आणि अक्षरजुळणी करणारे सुद्धा. सगळ्यांना कळवून झालं आणि मग डोक्याला हात लावून विचार करत बसले. अरुणची आणि माझी पहिली भेट झाल्यापासूनच्या सगळ्या आठवणींनी गर्दी केली. मला ते १९८८ चे दिवस आठवले. ‘मराठी रियासती’चे दिवस. रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी लिहिलेले आणि स्वतःच प्रकाशित केलेले ‘मराठी रियासत’ नावाचे आठ खंड म्हणजे मराठेशाहीचा समग्र इतिहास असलेले इतिहासग्रंथ गेली अनेक वर्षं दुर्मीळ झालेले होते. कर्नल मनोहर माळगांवकर आणि बडोद्याचे महाराज फत्तेसिंहराव गायकवाड यांनी पुढाकार घेऊन या ग्रंथांची नवीन आवृत्ती काढण्यासाठी एक योजना आखली होती. त्या योजनेप्रमाणे सुप्रसिद्ध लेखक व इतिहाससंशोधक श्री. स. मा. गर्गे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली तेरा जणांचं संशोधक-संपादक मंडळ नेमून त्यांनी ‘मराठी रियासत’ नवीन स्वरूपात, नवीन संदर्भांसह प्रकाशित करण्याची पूर्वतयारी पूर्ण करत आणली होती. या अत्यंत महत्त्वाच्या प्रचंड प्रकल्पाचं प्रकाशन करण्याच ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या


चाचणी सभासदत्व घ्या

किंवा

आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लॉगिन करा

ललित- एप्रिल-मे-जून २०२०

प्रतिक्रिया

  1. jrpatankar

      2 वर्षांपूर्वी

    फडके सरांचं कामच तसे आहे.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen