वयम्

शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे. ‘वयम्’चे बोधवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’. ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट हे ‘वयम्’चे प्रकाशक आहेत. त्यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ सुरू झाले आहे.

 

‘वयम्’ च्या सल्लागार मंडळात आहेत- डॉ. अनिल काकोडकर, कुमार केतकर, डॉ. आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर, राजीव तांबे, श्रीकांत वाड. ‘वयम्’च्या मुख्य संपादक शुभदा चौकर आहेत. ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव आणि नामवंत चित्रकार निलेश जाधव ‘वयम्’चे कलात्मक बाजू सांभाळतात.

बहुविध चे सभासदत्व* घ्या. किंमत फक्त रु. ५१६/-

वयम्

चमकदार

आभा अमला अभिजित | 30 Mar 2021

आतातर त्याला ‘नासा’ (NASA)च्या एका परिषदेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी त्याने पृथ्वीवरच्या १७६० आणि चंद्रावरच्या २०० लाव्हा ट्यूब्जचे संशोधन केले आणि तो अभ्यास आता शास्त्रज्ञांसमोर सादर करणार आहे. एवढं चमकदार काम करणारा सोनित लहानगा आहे, हे त्याला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय जाणवणारही नाही. तो मोठ्या संशोधकासारखा बोलतो, त्यांच्यातच जास्त वावरतो.

रंगरंगिली दुनिया !

सुजाता छत्रे | 26 Mar 2021

तुम्हांला किती रंग माहीत आहेत, त्यांची यादी करून बघा. त्या रंगांची नावे आणि त्यापुढे त्यांचे वर्णविशेष/Hue अशीही यादी करा, मजा येईल! एखादा रंग जरी आपण घेतला, तरी त्या रंगाच्या अनेक छटा आपल्याला निसर्गात बघायला मिळतात. सूर्यफुलाचा पिवळा, हळदी पिवळा, लिंबाचा पिवळा, आंब्याचा पिवळा आणि सूर्यकिरणांचा सोनपिवळा! आहेत ना ह्या पिवळ्या रंगाच्या विविध छटा? तशाच इतर सर्व रंगांच्या अनेक छटा निसर्ग दाखवतो. निसर्गातल्या ह्या प्रत्येक रंगछटेला एक क्रमांक देऊन सूत्रात बसवता येते. आपली मराठी भाषा रंगछटादर्शक शब्दांनी अगदी श्रीमंत आहे. अशा रंगांच्या छटा व त्यांचे शब्द यांची संगती जुळवल्यास तो एक शब्द-खजिनाच ठरेल.

अॅनिमेशनच्या पूर्वज !

मेधा आलकरी | 24 Mar 2021

या बाहुल्यांना ‘कठपुतळी’ म्हणतात, कारण त्यांचा मुखवटा लाकडाचा असतो. काठ म्हणजे लाकूड. चेहरा आणि मान एकाच लाकडापासून बनवलेली असते. अंडाकृती चेहऱ्यावर रेखीव नाक आणि मोठे ओठ कोरून काढतात आणि मत्स्याकृती डोळे व धनुष्याकृती भुवया मात्र रंगांनी रंगवल्या जातात. त्यांचा वेष बांधणी कापडाचा, चटकदार रंगांचा असतो. पुरुषाचा अंगरखा, डोक्यावरील साफा, पायातील जुती आणि झोकदार मिशा; तर स्त्रीचे दागदागिने आणि घेरदार घागरा. गंमत म्हणजे नाचणाऱ्या या स्त्रियांना पाय नसतातच. पण हे कलाकार त्यांना ठुमके द्यायला लावून इतके बहारदार नाचवतात की, गिरक्या घेणाऱ्या कठपुतळीला पाय नाहीत, हे मुळी आपल्या लक्षातच येत नाही.

खुसखुशीत भजी

आनंद घैसास | 14 Mar 2021

भज्यांसाठी बेसन (चण्याच्या डाळीच्या पिठालाच बेसन म्हणतात) भिजवताना त्यात सोडा घातला, तर भजी हलकी होतात, पण त्यावेळी मोहन नाही घालत. मोहन म्हणजे भजी हलकी होण्यासाठी पीठ भिजवताना त्यात जे तेल घातले जाते ते. हे मोहन कडकडीत तापलेल्या तेलाचे असते. याखेरीज तुरीच्या डाळीचे चांगले मऊसर शिजलेले वरण फेटून बेसनात घालतात. त्यामुळेही भजी हलकी होतात.

सोशल मीडिया की पर्सनल मीडिया? (उत्तरार्ध)

Anjali Kulkarni | 11 Mar 2021

आता मला पालकांसाठी म्हणून खास काही सांगायचंय. काही महिन्यांपूर्वी मोबाइलला हात लावू नको म्हणून सांगणाऱ्या पालकांना आता बदललेल्या परिस्थितीमुळे स्वतःच मोबाइल मुलांच्या हातात द्यावा लागलाय. मूल घरात आहे, तुमच्या समोर आहे, त्याच्या हातात मोबाइल आहे...पण ते मूल काय करतंय हे माहीत नाही अशी आज परिस्थिती आहे! मुलं सर्रास इंटरनेट वापरतायत. इंटरनेटवरच्या एखाद्या चॅनेलला किती Subscribers झाले की पैसे मिळतात हे मुलांना आधीच माहिती आहे. इंटरनेटवर प्रचंड माहिती आहे, जगभरातली माहिती आहे आणि कुणालाही न विचारता माहिती मिळते ही मुलांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे.

मधली सुट्टी ( फिनलंड शाळा भाग- १)

शिरीन कुलकर्णी | 08 Mar 2021

फिनलंडमधून आर्क्टिक सर्कल जाते. अर्थात फिनलंडच्या वरच्या भागातून. खाली दक्षिणेकडे बाल्टिक समुद्रकिनारा फिनलंडला लाभला आहे. फिनलंड पृथ्वीच्या अगदी वरच्या भागात, उत्तर ध्रुवापासून जवळ आहे. त्यामुळे फिनलंडचं हवामान थंड आहे. साधारणपणे ऑक्टोबर ते मार्च हे महिने हिवाळ्याचे, तर एप्रिल ते सप्टेंबर उष्ण हवामान. उन्हाळ्याची सुट्टी असते जून-जुलैमध्ये.

इंटरनेटच्या प्रवासाला जाताना

उन्मेष जोशी | 04 Mar 2021

पब्लिक प्लॅटफॉर्मवर, इन्स्टाग्रामवर जे मोठे ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्सवर लिंक टाकू नयेत, कारण त्या ग्रुपमध्ये अनेक लोक असतात. वरील घटनेत मुलांच्या सतर्कतेमुळे पुढचा धोका टळला होता. पण प्रत्येकवेळी असंच होईल असं नाही. हॅकर्स वेगवेगळ्या प्रकारे घुसण्याचा प्रयत्न करत असतात.

ऋषीऋण : चरक ऋषी

कांचन वाटवे-जोशी | 02 Mar 2021

सुरुवातीला चरकाचे म्हणणे धुडकावून लावणाऱ्या मित्रालाही चरकांनी त्यांचा होरा बरोबर असू शकतो, हे पटवले. नंतर त्याच मित्राच्या मदतीने त्यांनी ती मेलेली मेंढी आणि विषारी गवत, विषाची तीव्रता तपासण्यासाठी घरी नेले. सूक्ष्म निरीक्षण, परीक्षण आणि सहसंबंध जोडण्याच्या वृत्तीमुळे त्यांची आवड हळूहळू ज्ञानात बदलू लागली. गुरूगृही जाऊन त्यांनी आयुर्वेदाचा रीतसर अभ्यास सुरू केला.

पाण्यावर झगमग

डॉ. उज्ज्वला दळवी | 28 Feb 2021

प्लँक्टन (Phytoplanktons = भटक्या वनस्पती) समुद्रात वरच्यावर तरंगत असतात. काजव्यांमध्ये असतं तसंच ल्युसिफेरीन नावाचं जैविक प्रकाश (Bioluminescence) देणारं रसायन त्या प्लँक्टनमध्ये असतं. लाटा हलल्या, मासे सळसळले, जहाजं, बोटी पाणी कापत गेल्या की, प्लँक्टनना धक्का लागतो. धक्का देणाऱ्या त्या शत्रूला पळवून लावायला ते रसायन प्रकाशित होतं.

पर्यावरणाचा सच्चा दोस्त

'वयम्' प्रतिनिधी | 26 Feb 2021

सोहम नववीत असताना त्याने ‘लोकसत्ता’त स्वीडनच्या ग्रेटा थुनबई (सगळेजण तिचे नाव थुनबर्ग असे लिहितात, पण त्याचा स्वीडिश उच्चार आहे- थुनबई) बद्दल वाचले. तिच्या ‘Fridays for Future’ या मोहिमेची ओळख झाली. तेव्हा सोहमने ठरवले की, आपणही या मोहिमेत सहभागी व्हायचं! आता तो Fridays for future- Indiaच्या ४० जणांच्या Research and Study team मध्ये आहे

निसर्ग नवल : झाडाच्या पोटात पाणपोई

मकरंद जोशी | 24 Feb 2021

आकाराने प्रचंड असलेल्या बाओबाब वृक्षाची खासियत म्हणजे हे झाड त्याच्या खोडात पाणी साठवून ठेवू शकते. झाडाच्या वयानुसार आणि आकारानुसार अगदी दहा हजार लिटरपर्यंत पाणी साठवले जाते. हे झाड भोवतालच्या हवामानानुसार स्वतःचा आकार नियंत्रित करते. म्हणजे दुष्काळ असेल तर झाड आक्रसते आणि जेव्हा पाणी मुबलक असते तेव्हा फुगते.

सोशल मीडिया की पर्सनल मीडिया? (पूर्वार्ध)

Anjali Kulkarni | 11 Feb 2021

सोशल मीडिया वापरण्याची गरज असते. पण या मीडियाचा मी नुसता वापर करत नाही तर या माध्यमाचा, या विषयाचा बारकाईने अभ्यासही मी केलाय, त्यामुळे माझी काही निरीक्षणं तुमच्याशी शेअर करायला मला निश्चितच आवडेल. सोशल मीडियाचा सर्व बाजूंनी विचार करताना त्यातले ‘सोशल मीडिया आणि इकॉनॉमिक्स’,‘सोशल मीडिया आणि सायकॉलॉजी’ असे वेगवेगळे पैलूही विचारात घेणं महत्त्वाचं आहे.

मधुमनाची माणसं

राजीव तांबे | 10 Feb 2021

‘मधुपर्क’ म्हणजे मध नव्हे. आणि मुख्य म्हणजे फुलात मधुपर्क असतो, मध नसतो. मधमाशा मधुपर्कापासून त्यांच्याही नकळत मध तयार करतात.”भुवया उंचावत आज्जो म्हणाले, “आँऽऽ? हे मला माहीतच नव्हतं. इतके दिवस मलाही वाटायचं की, फुलात मध असतो आणि मधमाशा मध पितात. पण मधमाशाच मध तयार करतात हे मला आत्ताच कळलं.

खराखुरा ग्लोबल 'टीचर'

रेणू दांडेकर | 07 Feb 2021

रणजीत डिसले सरांचे एक मित्र असलेले शिक्षक प्रदीप तांदळे सर सांगत होते की, ते मुलांत मूल होऊन मिसळणारे शिक्षक आहेत. आपल्या वर्गातली मुलं आनंदाने शिकली पाहिजेत म्हणून ते धडपडतात. स्वभावाने नम्र आहेत. तक्रार करत बसण्यापेक्षा कोणताही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचं वाचन खूप आहे. जे जे नवं समजेल, ते ते अमलात आणण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यातून त्यांनी तंत्रज्ञानाचा असा कल्पक वापर केला. या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल १२ हजार नामांकने दाखल झाली होती. त्यापैकी १० शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळाले. त्यातून डिसले सरांची निवड झाली आणि त्यांना सुमारे ७ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला. यातली निम्मी रक्कम पुरस्कार न मिळालेल्या ९ शिक्षकांना वाटायची, असे त्यांनी ठरवले. आपल्या स्पर्धकांच्या कामाचेही कौतुक करण्याचा उमदेपणा आणि दानत रणजीत डिसले यांनी दाखवली, हेही विलक्षण आहे.

जिद्दी येसबा

प्रवीण दवणे | 01 Feb 2021

मुजरा करून येसबानं शिवरायांना म्हटलं, 'राजे, सोन्याच्या मोहरा आज हायेत, पण उद्या सरतील. पण आपली रयतेवरची किरपा (कृपा) अशीच राहू द्या. डोईवर स्वराज्याची आभाळागत माया नि या जिमिनीवरच प्रेम ते तेवढं कायम राहूद्या!'

धाडसी तापसी

पूजा सामंत | 29 Jan 2021

मित्रांनो, माझी ओळख ‘स्पष्टवक्ती’ अशी आहे. एकदा मी 'अमितजीं (अमिताभ बच्चन) सोबत 'बदला' या फिल्मचे शूटिंग करून स्कॉटलंड ते मुंबई असा दीर्घप्रवास करून मुंबईला यायला निघाले होते. जाम थकले होते. बोर्डिंग पास घेतल्यानंतर मी सीट बेल्ट लावून गाढ झोपून गेले. साधारण अर्ध्या तासाने मला चाहूल लागली की, माझ्या चेहर्‍यावर फ्लॅश पडतोय ! मोठ्या मुश्किलीने मी डोळे उघडले तर काय, शेजारच्या सीटवर बसलेली व्यक्ती माझ्या नकळत त्याच्या मोबाइलवर माझे फोटो काढत होती! हे सर्वस्वी गैर होते! मी ताबडतोब त्याच्यावर डाफरले! ‘स्टॉप धिस!’ विमानातले सगळे प्रवासी माझ्याकडे बघू लागले ! मी 'अटेन्शन सीकर' आहे अशी ओरड झाली! पण मी त्याची पर्वा केली नाही! चुकीच्या किंवा अन्यायकारक गोष्टींवर आवाज उठवतेच मी!

अंजनवेलचं दीपगृह

प्रा. सुहास बारटक्के | 18 Jan 2021

इथेच ते सुप्रसिद्ध दिवे सतत समुद्रातील नौकांना मार्गदर्शन करण्यासाठी फिरत असतात. या दिव्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे दिवे दर १५ सेकंदाला 3 वेळा समुद्राच्या दिशेने प्रकाशझोत सोडतात. हा प्रकाशझोत समुद्रात खोलवर ३५ किलोमीटर अंतरापर्यंत जातो व त्यामुळे समुद्रातील बोटींना अचूक रस्ता सापडतो. म्हणजे रत्नागिरीचं दीपगृह १५ सेकंदात 2 वेळा प्रकाशझोत फेकतं; तर जयगडचं दीपगृह हे १५ सेकंदात ३ वेळा प्रकाशझोत टाकला की समजायचं की, हे अंजनवेलचं दीपगृह. मग नाविक ज्या दिशेला जायचे त्या दिशेने नौका हाकतो.

कलाकार प्राणी

सुबोध जावडेकर | 15 Jan 2021

तुम्ही कुंभारमाशीचं घर पहिलं आहे का? ते काहीसं भुईमुगाच्या शेंगेसारखं दिसतं, आकारानेही ते शेंगेएवढंच असतं. आणि त्याचा रंगसुद्धा शेंगेसारखाच पिवळसर तपकिरी असतो. या ओस्मिया माशीचं घर आकाराने जरी आपल्याकडच्या कुंभारमाशीसारखं असलं तरी त्याचा रंग मात्र आपल्या कुंभारमाशीच्या घरासारखा मातकट नसतो. फार फार सुंदर असतो. लाल, जांभळा, गुलाबी, पिवळा, निळा अशा अनेक रंगांनी ते सजलेलं असतं! एखाद्या रंगीबेरंगी फुलांचा ताटवा असावा तसं. कारण ते मुळी रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांपासूनच बनवलेलं असतं.

मासा व्हायचं, पान नाही !

डॉ. आनंद नाडकर्णी | 09 Jan 2021

आराम केला ही चांगलीच गोष्ट आहे. आराम ही गरज असू शकते. थोडा जास्त आराम करणं ही फारतर चूक होती; तो गुन्हा नव्हता. गुन्ह्याला शिक्षा असते, चुकीची दुरुस्ती असते. त्यामुळे चुकीची दुरुस्ती करायची सुरुवात करावी. पण आरामाचं रूपांतर स्थितिशीलतेत (inertia) होऊ नये, याकडे लक्ष दिलं पाहिजे.

आता शुक्रावर स्वारी!

डॉ. बाळ फोंडके | 06 Jan 2021

शुक्राभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये राहून त्याच्या पृष्ठभागाचं तसंच वातावरणाचं निरीक्षण करण्याचं उद्दिष्ट ‘शुक्रयान-१’ पुढे ठेवलं गेलं आहे. या कक्षेमध्ये शुक्रयान त्या ग्रहाच्या सर्वांत जवळ म्हणजे ३०० किलोमीटर अंतरावर असेल; तर त्याचा सर्वांत दूरचा पल्ला ३६,००० किलोमीटर इतका दूर असेल. पण यानावर अतिशय संवेदनशील उपकरणांचा मोठाच संच असणार आहे. त्यामुळे खास करून वातावरणात होणार्याण निरनिराळ्या रासायनिक अभिक्रियांविषयीची तपशीलवार माहिती मिळू शकेल. त्यामुळे तिथे फॉस्फिन वायू कसा तयार होतो, याचं गूढ उकललं जाईल. त्यातूनच मग तिथे सजीव सृष्टी असण्याच्या शक्यतेचीही शहानिशा होण्याची उमेद बाळगता येते.

नववर्ष स्वागताच्या तऱ्हा

मेधा आलकरी | 01 Jan 2021

नववर्षाचा सूर्योदय म्हणजे त्यांच्या लेखी भाग्योदय! नववर्ष साजरं करण्याच्या किती वेगवेगळ्या प्रथा आहेत बघा. कुणासाठी रंग महत्त्वाचा. -शुभ्र म्हणजे शांती. कुणासाठी अॅक्शन महत्त्वाची- खुर्चीवरून उडी, लाटांवरून उडी, फर्निचरची फेकाफेक, नाहीतर पाण्याचा वर्षाव, दारात बशा फोडणे किंवा गल्लीत सामान घेऊन फिरणे! तर कुणासाठी खाणे महत्त्वाचे. गोलाकार संत्र, द्राक्ष, नाहीतर डाळिंबाचे दाणे. जेवणात नाण्यांची आठवण करून देणारी चवळी, किंवा काळासारखा पुढे पुढेच सरकत जाणारा मासा. या सगळ्या चालीरीतींमध्ये मला जाणवतो आशावाद ! नवीन वर्ष, नव्या आकांक्षा! नवी उमेद!... ‘एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवे जन्मेन मी!’

पोस्टमन बनला सांताक्लॉज

जोसेफ तुस्कानो | 30 Dec 2020

जेडेनच्या घरी पोस्टमनकाका वारंवार पत्रे घेऊन येत. कधी नियतकालिके आणि मासिके घेऊन येत. कधीतरी मनीऑर्डर आणत. छोट्या जेडेनला त्याचे खूप कुतूहल वाटे.
Install on your iPad : tap and then add to homescreen