पुनश्च

वि. स. खांडेकर ते पु. लं. देशपांडे आणि विंदा करंदीकर ते व. पु. काळे, अशा असंख्य दिग्गजांच्या लेखनाची सुरुवात ही विविध मासिके किंवा नियतकालिके यातूनच झाली होती. १५० वर्षांची परंपरा असलेल्या या नियतकालिकांनी मराठी रसिकांना विपुल व उत्कृष्ट साहित्य पुरवले. त्यातील आजही कालसुसंगत असलेल्या साहित्याचे डिजिटायजेशन करून इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आहे पुनश्च.

 

आजवर दोन हजार सभासदांनी पैसे भरून ज्यांचा डिजिटल रुपात आस्वाद घेतला आहे, असे दर्जेदार लेख मोबाईलवर किंवा पीसीवर वाचायला चोखंदळ वाचकांना नक्कीच आवडतील. कथा, इतिहास, अनुभवकथन, रसास्वाद, चिंतन, राजकारण आदी २७ साहित्य प्रकार आणि तब्बल १८६८ पासून दीडशे वर्षांचा कालखंड, एवढा मोठा पट मांडून, त्यातले निवडक साहित्य वेचून, रसिकांपर्यंत पोहोचवणे हेच पुनश्चचे लक्ष्य आहे. खालील लेखांवर एक नजर जरी फिरवली तरी विषयवैविध्याचा आणि दर्जाचा अंदाज सुजाण वाचकांना येऊ शकेल.

ऑनलाईन सभासदत्व घेण्यात काही अडचण आल्यास 9152255235 किंवा 9833848849 या क्रमांकांशी संपर्क करा.

बहुविध चे सभासदत्व* घ्या. किंमत फक्त रु. ५१६/-

पुनश्च

सुईच्या अग्रावरील साम्राज्य

सुरेश चांदवणकर | 24 Mar 2021

प्लेइंग रेकॉर्डसचा सुरुवातीचा काळ म्हणजे अनेकांचा सुवर्णकाळ होता. त्या काळात तबकडीचा झालेला प्रवास आणि तिचे विस्तारित होत गेलेले साम्राज्य सांगणारा हा लेख

लखलखीत

मंगला गोडबोले | 18 Mar 2021

सृजन या शब्दांत जशी प्रतिभा अनुस्यूत असते तशा 'पुलं'च्या व्यक्तिमत्वात सुनिताबाई गृहित धरल्या जात होत्या.मुळात स्वत:चा, स्वत:च्या जगण्याचा काही हेतू असणं आणि त्याच्याशी निष्ठूरपणे प्रामाणिक राहणं ह्यांतला वैचारिक लखलखीतपणा ही त्या व्यक्तिमत्त्वाची सर्वोच्च खासियत.

काही विचित्र लग्नपद्धती

श्रीकांत अ. रानडे | 13 Mar 2021

लग्नपद्धतीच्या रूढी फारच रंजक पण आपल्याला थोड्याशा विचित्र वाटणाऱ्या आहेत. लग्नपद्धतीच्या या चालीही त्यांनी पुरातन काळापासून टिकवून ठेवलेल्या आहेत.

पॉइन्ट टू टू

रोहिणी भट-साहनी | 03 Mar 2021

दारू पिण्याचासुद्धा परवाना असतो, असं ऐकलंय. तो रिन्यू करून घ्यायला गेलं, तर बरोबर बाटलीबिटली पण घेऊन जावी लागत असेल की काय? की थोडी पिऊन दाखवावी लागत असेल... म्हणजे जस्ट इन केस...

शिवाजीमहाराजांचे कार्य-कौशल्य

ग. ह. खरे | 23 Feb 2021

श्रीशिवाजीमहाराजांचे ठायी जो गुणसमुच्चय होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने कार्य केले त्याप्रमाणे कार्य करणारा आणि असा अलौकिक गुणसमुच्चय असणारा श्रीशिवाजीमहाराजांहून निराळा मनुष्य असेल असे वाटत नाही

शतपत्रे : पत्र नंबर 22 जातीविषयीं विचार

लोकहितवादी | 18 Feb 2021

आतां स्नानसंध्या केली तर धड ब्राह्मणाचें कर्मही साधावयाचें नाहीं. व वेळ फुकट जाऊन क्षत्रियांचे कर्मही बुडवाल. आणि कोणतेंच कर्म न केलेंसें होऊन नरकांत जाल.

एक तत्त्वज्ञानी कुबेर

नारायण वासुदेव फडके | 17 Feb 2021

तर्कशास्त्राच्या कसाला जे पूर्णपणे उतरेल तेच सत्य—मग ते जुने असो, नाहीतर नवे असो—अशीच शेटजींची विचारसरणी आहे. खरा तत्त्वज्ञानी कर्तृत्वशून्य नसून कर्तबगार असतो हे सिद्ध करणारे प्रताप मिल्सचे संस्थापक श्रीमंत प्रतापशेट, अंमळनेर, यांचे स्फूर्तिदायक चरित्र.

माझी पहिली कथा ( ऑडीओसह )

दि. बा. मोकाशी | 15 Feb 2021

कथा-कविता करणं सोपं आहे. अगदी फालतू काम आहे. खरं कठीण म्हणजे मोठे निबंधवजा पुस्तक लिहिणं. एखाद गंभीर विषय घेऊन ग्रंथ तयार करणं. लिहिलं तर तसं लिहावं. भुक्कड लिहिण्यात अर्थ नाही. असे तेव्हा माझे विचार होते. हा लेख आपण ऐकूही शकाल...

खानोलकरचे देणे - भाग २

पु ल देशपांडे | 10 Feb 2021

गूढ, अज्ञात, अनाकलनीय, रहस्यमय अशा ह्या जीवनातल्या असंख्य मानवी आणि अतिमानवी व्यापारांनी त्याला गुंगवून ठेवले. त्या गुंगण्यातून गाणी झाली—कहाण्या झाल्या.

खानोलकरचे देणे - भाग १

पु ल देशपांडे | 09 Feb 2021

हा एक नवलाचा पक्षी ह्या मराठी साहित्यात आला काय, गायला काय, नाचला काय, कधी कळले-कळलेसे वाटणारे बोलला काय आणि कळण्या-न कळण्याच्या सीमेवरचे काहीतरी सांगता सांगता एकदम पुन्हा ज्या अज्ञात घरट्यातून आला होता तिथे निघूनही गेला काय! त्याच्या निर्मितीसारखेच सारे काही अद्भुत.

खानोलकर यांच्या (तेंव्हा) अप्रकाशित कविता

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू) | 05 Feb 2021

८ मार्च रोजी कविवर्य आरती प्रभूंचा जन्मदिन होता -त्यानिमित्त त्यांच्या काही अप्रकाशित कविता खास पुनःश्चच्या वाचकांसाठी
Install on your iPad : tap and then add to homescreen