रुपवाणी

सिनेमा, फिल्म, मूव्ही, चित्रपट या शब्दांसाठी रवीन्द्रनाथ टागोरांनी एक अस्सल भारतीय शब्द वापरला-रूपवाणी-किती नेमका आणि अन्वयार्थक शब्द! रूप या शब्दातून या माध्यमाची दृश्यात्मकता तर वाणी या शब्दातून त्याचे ध्वनिरूप सूचित होते. त्यातूनच या चित्रपट अभ्यासविषयक नियतकालिकाचे नामाभिधान झाले-वास्तव रूपवाणी.
वास्तव रूपवाणी हे ‘प्रभात चित्र मंडळा’चे चित्रपट अभ्यासविषयक नियतकालिक गेली २५ वर्षे सातत्याने चालू आहे. चित्रपट संस्कृती खऱ्या अर्थाने रुजायची असेल, तर स्थानिक भाषांतून व्यवहार झाला पाहिजे, हे लक्षात घेऊन सुधीर नांदगावकर यांनी ‘वास्तव रूपवाणी’या मासिकाची १९९४ मध्ये सुरुवात केली. अमोल पालेकर, अरुण खोपकर, श्यामला वनारसे, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, अशोक राणे, सुधीर नांदगांवकर, विजय पाडळकर, अनिल झणकर, रेखा देशपांडे ते थेट श्रीकांत बोजेवार, सुषमा दातार, गणेश मतकरी, अभिजित रणदिवे, संतोष पाठारे, अभिजित देशपांडे आदी अनेक जाणकारांनी ‘रूपवाणी’तून सातत्याने चित्रपटविषयक महत्त्वपूर्ण लेखन केले आहे.

 

सध्या सर्व विद्यापीठांतून माध्यमविषयक अभ्यासक्रम व त्याचा भाग म्हणून चित्रपटविषयक अभ्यासक्रम शिकवले जाऊ लागले आहेत. लवकरच चित्रपटविषयक स्वतंत्र विभाग व विद्यापीठेही अस्तित्वात येतील, तशा हालचालीही सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर, ‘वास्तव रूपवाणी’ सारख्या अभ्यासपूर्ण चित्रपटविषयक नियतकालिकाची विशेष आवश्यकता आहे. चित्रपटकलेचा जाणता रसिक व अभ्यासक घडवण्याचे काम ‘वास्तव रूपवाणी’ने सुरू ठेवले आहे. काळानुरूप या अंकाचे स्वरूप बदलते आहे एवढेच. बहुविध डॉट कॉमवर ‘रुपवाणी’च्या अंकातील लेखांसोबतच इतरही चित्रपटविषक काही मजकूर, चित्रफिती, माहिती दिली जाणार आहे. 465

बहुविध चे सभासदत्व* घ्या. किंमत फक्त रु. ५१६/-

रुपवाणी

आनंदी गोपाळ - प्रेरणादायी 

टीम सिनेमॅजिक | 30 Mar 2021

या चित्रपटाला अनेक बाजू आहेत. एका दृष्टीने तोआनंदीबाईंची आणि गोपाळरावांचीही यशोगाथा आहे. दुसऱ्या बाजूने ती अनिष्ट सामाजिक प्रवृत्तींवर केलेली टिका आहे.

चित्रस्मृती - सिनेमा हिट झाला आणि चरित्र नायक 'हीरो ' झाले.....

दिलीप ठाकूर | 23 Mar 2021

सिनेमाचा पहिला शो सुरु झाला तोच राजाच्या भूमिकेतील अशोककुमार आणि राणाच्या भूमिकेतील प्राण यांच्यावरील 'दो बेचारे बिना सहारे देखो पुछ पुछ कर हारे ' या गाण्याच्या क्रेझने!

विशफुल थिंकिंग आणि निशिकांत कामत

टीम सिनेमॅजिक | 06 Dec 2020

सकारात्मक भावनेचा आविष्कार निशिकांत कामतच्या चित्रपटातून पहायला मिळाला. त्याच्या सगळ्या व्यक्तिरेखा न्याय मिळवण्यासाठी आपापल्या क्षमतेनुसार व्यवस्थेशी लढा देताना आणि त्यात यशस्वी होताना दिसतात. चित्रपटातील विशफुल थिंकिंग वास्तवात मात्र अभावानेच उतरतं, हे निशिकांत कामतच्या अकाली मृत्यूने सिद्ध करून दाखवलं.

असिस्टंटच्या नजरेतून... चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी

टीम सिनेमॅजिक | 19 Oct 2020

साहित्यकार रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शित केलेल्या   'इन्व्हेस्टमेंट' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात त्यांना दिग्दर्शनात सहाय्य करणारे त्यांचे सहकारी अरविंद औंधे यांनी वाहिलेली आदरांजली !

सत्यजित रे यांच्या मिश्कील चष्म्यातून दिसणारं अंधारयुग

टीम सिनेमॅजिक | 12 Oct 2020

 'शतरंज के खिलाडी ' हा चित्रपट रे यांच्या एकूण फिल्मोग्राफीमध्ये खूप वेगळा आणि त्यामुळे विशेष नोंद घेण्यासारखा सिनेमा आहे , त्याबद्दल लिहित आहेत अमोल उदगीरकर ....

समृद्ध होण्याचा काळ

टीम सिनेमॅजिक | 04 Oct 2020

सत्यजित रे यांच्या चित्रपटांनी तरुण चित्रपट रसिकांवर मोहिनी घातली आहे . नारायण अंधारे यांनी सत्यजित रे यांच्या चित्रपटांचा घेतलेला आस्वाद... 

सप्तरंगी

टीम सिनेमॅजिक | 06 Sep 2020

वटवृक्षाच्या छायेखाली इतर झाडंझुडपं वाढत नाहीत,असा निसर्गनियम आहे. इथं तर खुद्द कपूर कुटुंबातच राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर असे तीन वटवृक्ष होते. सहकलावंतांपैकी म्हणाल तर अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र हे आणखी काही वटवृक्ष. परंतु, ऋषी कपूर नावाचं रोपटं या सर्व वटवृक्षांच्या सावलीत राहून नुसतंच रुजलं, वाढलं नाही तर ते सर्वदूर पसरलं. त्याला कालांतरानं फळं, फुलं लागली नि त्यानं आपल्या छायेत आलेल्या प्रत्येकाचं मन सुगंधी केलं.

इरफान खान  - कॉमनमॅन

टीम सिनेमॅजिक | 30 Aug 2020

इरफान नावाचा कलाकार त्याच सर्वसामान्य पात्रांमध्ये विखुरला गेलाय. इरफान खरंच 'रुह' झालाय. हैदरमधला इरफानचा डायलॉग आठवतोय? इरफानने सांगितलं होतं, "मैं था, मैं हुं, मैं ही रहुंगा"! इरफान अजूनही त्याच्या चित्रपटांत आहे, आणि तो तिथेच असेल. हो, फक्त आता त्याला अजून संधी मिळणार नाही स्वतःला अजमावून पहायची इतकंच! आपण त्याला नवनव्या भूमिकांमध्ये पाहू शकणार नाही इतकंच! पण तो मकबूल असेल, तो लंचबॉक्स मधला फर्नांडिस असेल, तो पानसिंग तोमर असेल, तो रुहदार असेल. कधी पाय पटेल होऊन, कधी डॉ राठा होऊन, कधी योगी होऊन, कधी शौकत होऊन इरफान आपल्याला भेटत राहील.

 A Journey to Cinema of Satyajit Ray

टीम सिनेमॅजिक | 23 Aug 2020

जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं  कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत.

सत्यजित राय  एक अनुभव

टीम सिनेमॅजिक | 16 Aug 2020

जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं  कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत.

सत्यजित राय

टीम सिनेमॅजिक | 02 Aug 2020

जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं  कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत.

तामिळनाडू, राजकारण आणि सिनेमा

टीम सिनेमॅजिक | 26 Jul 2020

चित्रपटाचा वापर राजकीय प्रपोगंडा पसरवण्याचं माध्यम म्हणून सुद्धा वापरलं गेलं. आपल्या देशात तामिळनाडूच्या राजकीय इतिहासाकडे डोळसपणे पाहिलं तर तिथल्या सत्ताकारणावर सिनेमाचा असलेला प्रभाव आपण सहज लक्षात येतो.
Install on your iPad : tap and then add to homescreen